Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • पुढील 6 महिन्यांत आणखी 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
ताज्या बातम्या

पुढील 6 महिन्यांत आणखी 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Vande Bharat Sleeper

Vande Bharat Sleeper Train : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आली. गुवाहाटी आणि कोलकाता दरम्यान लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या ट्रेनची पाहणी केली आणि त्यातील सुविधांचा आढावा घेतला. पुढील सहा महिन्यांत आठ नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केल्या जातील, या वर्षाच्या अखेरीस ही संख्या 12 पर्यंत वाढेल असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं.

किती आहे प्रवासी क्षमता :

पुढील 15-20 दिवसांत सुरु होणारी ही ट्रेन दोन राज्यांना जोडणारी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. रेल्वे प्रवास सुधारण्याच्या दिशेनं हा एक महत्त्वाचा उपक्रम असेल. 16 डब्यांच्या या एसी ट्रेनची प्रवासी क्षमता 823 प्रवाशांची आहे, ज्यामध्ये 11 थर्ड एसी कोच, चार सेकंड एसी कोच आणि एक फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये 611 प्रवासी, सेकंड एसीमध्ये 188 आणि फर्स्ट एसीमध्ये 24 प्रवासी बसू शकतात. (Vande Bharat Sleeper Train)

180 किमी प्रतितास वेग :

ही ट्रेन ताशी 180 किमी वेगानं धावू शकते. सुरक्षिततेचा काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे, ज्यामध्ये ऑटोमेटेड ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम (एसीपी), अग्निसुरक्षा प्रणाली आणि एआय-आधारित कॅमेरे यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सेन्सर दरवाजे बसवले आहेत. सीट्स आरामदायी असताना, स्वच्छतेचे देखील काळजीपूर्वक निरीक्षण केले गेले आहे. उच्च स्वच्छता मानके राखण्यासाठी जंतुनाशक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या तंत्रज्ञानामुळं 99.9 टक्के जंतू नष्ट होतात.

थर्ड एसीचं तिकिट ₹2300 :

या ट्रेनमध्ये जेवणासह थर्ड एसीचं तिकिट ₹2300, सेकंड एसीमध्ये ₹3000 आणि फर्स्ट एसीचं तिकिट ₹3600 असेल. रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की गुवाहाटी ते कोलकाता पर्यंतचं विमान भाडं ₹6000 ते ₹8000 पर्यंत आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts