Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बंगालमध्ये TMC चे ५९ आमदार फुटले, ममतांनी घेतला तडकाफडकी मोठा निर्णय…
Top News

बंगालमध्ये TMC चे ५९ आमदार फुटले, ममतांनी घेतला तडकाफडकी मोठा निर्णय…

TMC MLAs Rebel in Bengal

TMC MLAs Rebel in Bengal : पश्चिम बंगालच्या राजकारणात महाप्रलय आल्याचे दिसून येत आहे. ज्या महाप्रलयाने शिवसेना, राष्ट्रवादी फूटली आणि अनेकांची राजकीय आयुष्य उद्धवस्त झाली तर कवडीमोल किंमत नसणाऱ्यांच्या भोवती सध्या राज्याचं राजकारण फिरत आहे. त्याच धरतीवर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याची कबुली माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका पोस्टमुळे या दुजोरा मिळाला आहे. त्यानंतर ममतांना तडकाफडकी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षात उभी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा या दोन आमदारांना पक्षातून काढलं आहे. त्यानंतर जवळपास ५९ पेक्षा जास्त आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपदेखील अॅक्शन मोडमध्ये आला आहे. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तृणमूलच्या 18 आमदारांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे आता तृणमूलची शिकार करण्यासाठी भाजपादेखील सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री सुवेंद्र अधिकारी यांच्या बैठकीला टीएमसीचे १८ आमदार उपस्थित

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी हावडा आणि दक्षिण 24 परगाणा या दोन भागांची एक प्रशासकीय बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण तृणमूल काँग्रेसच्या 18 आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीत जावेद खान, फिरहाद हकीम, नयना दास बॅनर्जीक, कुणाल घोष, ऋतब्रत बॅनर्जी, संदीपन साहा, अशोक देव, अरुणाभा सेन, समीर पांजा, प्रिया पाल, गुलशन मल्लिक, तपस मैती, नीलिमा मिस्त्री, अब्दुल खालेक मोल्लाह, बहारुल इस्लाम परेशराम दास, जॉयदेव हलदर, समीर जाना, या आमदारांनी सुर्वेदू अधिकारी यांच्या बैठकीत हजेरी लावली.

80 आमदारांपैकी 59 आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीमागे

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या 80 आमदारांपैकी 59 आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीमागे राहण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फूट लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनीही मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी पक्षातील सर्व समित्या आणि इतर संघटना बरखास्त केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने मोठ्या विचाराअंती पक्षाच्या सर्व संघटना, त्यावरील नियुक्त्या बरखास्त केल्या आहेत, असे सांगितले आहे.

लवकरच आम्ही र्वसमावेशक आत्मपरीक्षण, कामगिरीचा आढावा आणि संघटनात्मक मूल्यांकन करू आणि संघटनांची पुनर्रचना करू, असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय घेऊन आता ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे सर्व अधिकार आपल्याकडेच घेतल्याचे बोलेल जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts