Instagram Instants Feature: इंस्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी ‘instants’ नावाचं नवीन फिचर लॉन्च केलं आहे. चला तर जाणून घेऊयात हे नेमकं कास काम करतं.
इंस्टाग्रामने (Instagram) आपल्या युजर्ससाठी “Instants” नावाचं फिचर लॉन्च केलं आहे. हे फिचर खास रिअल- टाइम फोटो शेअरिंगसाठी तयार करण्यात आलं असून, यूजर्सना अधिक नैसर्गिक आणि प्रायव्हेट सोशल मीडिया अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या फीचरची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
काय आहे Instants फीचर?
‘इन्स्टंट्स’ हे फीचर बऱ्याच अंशी स्नॅपचॅटसारखेच काम करते. याचे युजर्स झटपट फोटो क्लिक करून ते मित्रांसोबत शेअर करू शकतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे फोटो काही काळानंतर आपोआप नाहीसे होतात. एकदा फोटो पाहिल्यानंतर तो पुन्हा दिसत नाही आणि २४ तासांनंतर तो पूर्णपणे नाहीसा होतो. यामुळे फोटो शेअरिंग अधिक खाजगी आणि मजेशीर बनते.
हेही वाचा: पार्थ पवारांबाबत शरद पवारांकडे थेट तक्रार; राष्ट्रवादीत रुसवा-फुगवा वाढला!
इन्स्टंट्स फीचर कसे काम करेल?
हे फीचर इंस्टाग्राम ॲपमध्येच उपलब्ध असेल आणि त्यासाठी एक स्वतंत्र इन्स्टंट्स ॲप उपलब्ध आहे. ॲप उघडताच लाईव्ह कॅमेरा सुरू होतो, ज्यामुळे वापरकर्त्याला त्वरित फोटो काढता येतात.
फोटो काढल्यानंतर, वापरकर्ता फक्त जवळच्या मित्रांना किंवा जास्त फॉलोअर्स असलेल्यांनाच फॉलोबॅक करतो आणि तो फोटो त्यांच्यासोबत शेअर करत राहतो. या फीचरमध्ये गॅलरीमधून फोटो अपलोड करण्याची परवानगी नाही. म्हणजेच, तुम्ही फक्त त्याच क्षणी काढलेले फोटो शेअर करू शकाल.
याशिवाय, फोटो एडिट करण्याचा कोणताही पर्याय नाही. फक्त छोटे कॅप्शन टाकता येतात. त्यामुळे फोटो अधिक खरा आणि अस्सल दिसतो.
स्नॅपचॅट आणि बीरिअलसारखा अनुभव
हे फीचर काही प्रमाणात स्नॅपचॅट आणि बीरिअलसारखेच आहे. अस्सल आणि कोणत्याही फिल्टरशिवाय कंटेंट शेअर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्टाग्रामने हे फीचर विकसित केले आहे.
प्रायव्हसीसाठी खास फीचर्स
युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन इंस्टाग्रामने काही खास पर्याय दिले आहेत. चुकून फोटो पाठवला गेल्यास समोरच्याने तो पाहण्यापूर्वी ‘Undo’ करता येतो.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगवरही नियंत्रण ठेवण्यात आलं आहे, ज्यामुळे फोटो अधिक सुरक्षित राहतील.
तरुण यूजर्ससाठी विशेष नियंत्रण
किशोरवयीन मुलामुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन, फॅमिली कंट्रोल्स, स्क्रीन टाइम लिमिट आणि स्लीप मोड यांसारखे पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे, किशोरवयीन मुले हे ॲप सुरक्षितपणे वापरू शकतील.
इंस्टाग्रामचे नवीन ‘इन्स्टंट्स’ हे फीचर, सोशल मीडियावर अधिक वास्तविक आणि कमी एडिट केलेल्या कंटेंटला प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जाते.






