CJP Twitter account suspended : सोशल मिडीयावर सत्तेला सुरुंग लावणारं वादळ, म्हणजेच कॉक्रोज जनता पार्टी या पक्षाचं ट्विटर अकाउंट अखेर भारतातून बंद करण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. अवघ्या काही तासांमध्येचं एक कोटी ४० लाखांचा फॉलोअर्सचा टप्पा पार करणाऱ्या क्रोकोज जनता पार्टीचा आवाज दाबण्यात आल्याचे बोलले जात आहे. अवघ्या ४ दिवसांत मोठ्या संख्येने भारतातील जनतेनं या पार्टीला समर्थन दिलं होतं आणि थेट दिल्लीच्या तख्ताला घाम फोडला होता. त्यामुळेच की काय? सरकारवर प्रचंड दबाव आला, हे सोशल मिडीया आंदोलन इतक्या जोराने घोंगावत होतं कि सरकार कोसळण्याची भीती सत्ताधाऱ्यांना होती कि काय? म्हणून क्रोक्रोज जनता पार्टीच्या अकाउंटला बंद करण्यात आलंय, असा आवाज तरुणांच्या तोंडून येत आहे.
१५ मे २०२६ ला एका सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ म्हटलं. आणि काही वेळातच इंटरनेटवर वातावरण पेटलं. छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपके या मराठी पोरानं सोशल मिडीयावर कोक्रोज जनता पार्टी सुरु केली, आणि बघता बघता १ करोड पेक्षा जास्त लोकं या पार्टीशी जोडली गेली, आणि दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राच्या पोरानं जोरदार धक्का दिला. सरकार पडतंय की काय? अशी धास्ती मोदी सरकारला लागणी आणि थेट अकाउंट बंद करून तरुणाचा आवाज दाबण्याचे काम केले गेले.
हेही वाचा – शरद पवार गटाच्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?
शिक्षणमंत्र्यांनी थेट राजीनामा द्यावा, अशीही मागणी
सध्या देशाच्या राजकारणात सर्वात मोठी पार्टी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला मागे पाडून कॉक्रोज जनता पार्टी सोशल मिडीयावर वरचढ चढली. शिक्षणव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि येथील राजकीय व्यवस्थेच्या नाड्या आवळण्याचे काम सोशल मिडीयावरून गेल्या काही तासांमध्ये मोठ्या प्रभावीपणे कोक्रोज जनता पार्टीने सुरु केलं, थेट शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी कोक्रोज जनता पार्टीने केली. या पार्टीचे ध्येय धोरणं पाहून करोडो लोकं काही तासात जोडले गेल्याने, सरकार विरोधी मोहोम सुरु होऊ शकते आणि हे आंदोलन मोठे होऊ शकते या भीतीने कोक्रोज जनता पार्टीला पहिला मोठा धक्का मिळाला आहे. भारतातून कोक्रोज जनता पार्टीच अकाऊट बंद करण्यात आलं. करोडो तरुणाचं तोंड दबानाचे काम हे अकाऊट बंद करून सरकारने केले आहे, त्यामुळे कोक्रोज जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
संस्थापक अभिजित दिपके यांची अकाऊट बंद झाल्यानंतर व्हिडिओ पोस्ट
कोक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी अकाऊट बंद झाल्यानंतर त्यांच्या पर्सनल सोशल मिडिया वरून यासंदर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यांनी म्हटलंय कि, कोक्रोज जनता पार्टीचे सोशल मिडिया हँडल का बंद केले जात आहेत, सरकार का घाबरलय आम्हाला, खऱ्या गोष्टींना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा घणाघात अभिजित दिपके यांनी केलाय तर, देशभरातून सरकारवर जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. आज २१ मे २०२६ रोजी सरकारच्या Legal Demand नंतर X प्लॅटफॉर्मने हे हँडल भारतात ब्लॉक केले. आणि त्यानंतर लगेचच कोक्रोज जनता पार्टीचे instagraam अकाऊट सुद्धा भारतातून बंद करण्यात आलं आहे. हे अकाऊंट ओपन केल्यास त्यावर ‘Account Withheld’ असा मेसेज दिसतोय.
इन्स्टाग्रामवर या पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या दीड करोड
फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढल्याने हि कारवाई केली जात आहे असा आरोप होतोय. कोक्रोज जनता पार्टीच्या अकाऊटवर कारवाई करण्याच्या आधीच इन्स्टाग्रामवर या पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या दीड करोड पर्यंत पोहोचली होती. ज्यामध्ये त्यांनी भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी या सर्व पक्षांना मागे टाकल होतं. अकाऊट का बंद केले याच अधिकृत कारण अजून देण्यात आले नाही. मात्र, यामध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशी दोन प्रमुख कारणे समोर येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जेव्हा एखादे अकाऊंट अचानक बॅन होते, तेव्हा कम्युनिटी गाईडलाईन्स पॉलिसीचे उल्लंघन किंवा स्पॅम ॲक्टिव्हिटी म्हणून ते ब्लॉक केलं जातं. कोक्रोज जनता पार्टीला ४ दिवसांत करोडो लोकांनी फॉलो केलं, कमी वेळात संशयास्पद रितीने वेगाने फॉलोअर्स वाढणे हे तांत्रिक कारण दिले जाते. अवघ्या ४ दिवसांत या अकाऊंटने लाखो फॉलोअर्सचा टप्पा ओलांडल्यामुळे ते सरकारच्या कम्युनिटी गाईडलाईन्स रडारवर आले असण्याची शक्यता आहे.
राजकीय दबाव आणि सूडबुद्धीची कारवाई
तर दुसरीकडे राजकीय दबाव आणि सूडबुद्धीचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओद्वारे या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यामागे राजकीय दबाव आणि सूडबुद्धीची कारवाई असल्याचे कारण दिले आहे. डिजिटल माध्यमातून तरुणांचा वाढता पाठिंबा आणि व्यवस्थेवर होणारे हल्ले यामुळे घाबरून केंद्र पातळीवरून दबाव आणून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. या अकाऊंटवरील बंदीमुळे सोशल मीडियावर ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘डिजिटल सेन्सॉरशिप’ यावरून मोठा वाद आणि चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एका व्हिडिओमध्ये माहिती दिली की, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर संशयास्पद लॉगिन आणि हॅकिंगचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत.












