Cockroach Janata Party Chief Spokespersons : गेल्या महिन्यापासून देशात कॉकरोच जनता पार्टीची एकच चर्चा सुरू आहे. या डिजिटल चळवळीने देशातील तरुणाईचे लक्ष वेधले आहे. बेरोजगारी आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात या पक्षाने एल्गार पुकारला आहे. तर तीन दिवसांनी दिल्लीत मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला आता प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह इतर अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींपूर्वी कॉकरोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची नावं जाहीर केली आहे. एक्स हँडलवर अभिजीत दीपके यांनी याविषयीची पोस्ट केली आहे. तर पक्षाच्या एक्स हँडलवरही ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची नावं जाहीर केली आहेत. अधिकृत एक्स हँडलवर पक्षाने या तिघांची नावं जाहीर केली आहे. त्यांच्याविषयी माहिती दिली आहे.
तीन प्रवक्त्यांची नियुक्ती
कॉकरोच जनता पार्टीने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, ज्या तीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जनता आणि मीडिया समोर आंदोलनाशी संबंधित सर्व माहिती देतील. CJP ने शोध पत्रकार सौरव दास यांना मुख्य प्रवक्ते केले आहे. तर लेखक आणि निर्माता विजेता दहिया आणि IIT Kanpur चे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे. सीजीपी भारताची राजकीय भाषा आणि विचार बदलण्याचे काम करत आहे. नवीन पिढीतील नेत्यांच्या नेतृत्वात हे काम करण्यात येईल असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जंतरमंतर मैदानावर शक्ती प्रदर्शन
कॉकरोच जनात पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे 6 जून रोजी भारतात परतत आहेत. त्यांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी जंतरमंतरवर प्रदर्शन करण्यात येणार आहे.
सीजेपीने एक्सवर नवीन खाते सुरू
या अगोदर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत कॉकरोच जनता पार्टीचे एक्स खाते बंद करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणांनी व्हायरल मॅसेजमुळे चिंता व्यक्त केली होती. सुरुवातीच्या अगदी काही तासातच या पक्षाला मोठे फॉलोअर्स मिळाले. तर काही दिवसात या पक्षाने फॉलोअर्सचे विक्रम नोंदवले. भाजप आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यालाही फॉलोअर्समध्ये या पक्षाने मागे टाकले होते. पण पक्षाचे एक्स खाते सस्पेंड करण्यात आले. तर इन्स्टाग्राम खातेही हॅक करण्यात आले. त्यानंतर सीजेपीने एक्सवर नवीन खाते सुरू केले.











