Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून वारंवार अत्याचार
गुन्हा

जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून वारंवार अत्याचार

Jalgaon minor girl assault case

Jalgaon minor girl assault case : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील दोन आरोपींना तातडीने अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा – मुंबईत ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत काढली, ११११ फुटाची तिरंगा यात्रा

मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत काकणबर्डी परिसर आणि अंतुली रोडवरील शेतात ही घटना घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपी पवन संजय परदेशी आणि प्रथमेश पाटील यांनी तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेवर आरोपींनी वेळोवेळी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. दोघेही पाचोरा येथील रहिवाशी आहेत.

याशिवाय, तिसरा आरोपी विकी शिवाजी राजपूत याने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून २१ जानेवारी रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक राहुलकुमार निहाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पवन परदेशी आणि प्रथमेश पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts