PSI Wedding Controversy: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. मात्र कधी कधी याच लग्नसोहळ्यात धक्कादायक घटना समोर येतात. अशीच एक खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे.
लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र कधी कधी या सोहळ्यात अनपेक्षित अडचणी आणि धक्कादायक घटना समोर येतात. अशीच एक खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. लग्नाला अवघे ११ दिवस शिक्कल असताना एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) अचानक लग्नास नकार दिल्याचा आणि त्यानंतर मुलीच्या कुटूंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: महायुतीतील अंतर्गत वाद दिल्ली दरबारी, समेट होणार? की, शिंदे गेल्या पावली परतणार…
नेमकं प्रकरण काय?
बीडमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर यांचा विवाह ठरला होता. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मात्र लग्नाला फक्त ११ दिवस शिल्लक असताना त्यांनी अचानक “मुलगी मला शोभत नाही” असे म्हणत लग्न मोडल्याचे समोर आले आहे. मुलीच्या कुटूंबियाचा आरोप आहे की, याच वेळी त्यांनी सरकारी पिस्तूल दाखवून धमकावले आणि दडपण आणण्याचा प्रयत्न केला.
मोठा आर्थिक फटका
या प्रकरणात मुलीच्या कुटूंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार साखरपुड्यासाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च झाला होता. तसेच लग्नाच्या तयारीसाठी भांडी, फर्निचर आणि इतर खरेदी मिळून एकूण १४ ते १४.५ लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.
लग्न ऐनवेळी मोडल्याने कुटूंबावर मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.
पोलिसांत परस्पर तक्रारी
यात मुलीच्या कुटुंबीयांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार PSI पवन निंबाळकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे, PSI यांच्या बाजूनेही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तपास सुरू
या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप झाल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.












