Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • NEET पेपरफुटी प्रकरणातील मोठा मास्टरमाईंड सीबीआयच्या जाळ्यात; नेमके कोण आहेत पी. व्ही. कुलकर्णी? पाहा A टू Z संपूर्ण माहिती
ताज्या बातम्या

NEET पेपरफुटी प्रकरणातील मोठा मास्टरमाईंड सीबीआयच्या जाळ्यात; नेमके कोण आहेत पी. व्ही. कुलकर्णी? पाहा A टू Z संपूर्ण माहिती

NEET Paper Leak: नीट परीक्षा पेपर लीक प्रकारांत सीबीआयने मोठी कारवाई करत माझी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी ताब्यात घेतले आहे. तपासात ते या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटमागील प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी असलेल्या संबंधांमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

देशभरात चर्चेत असलेल्या NEET Exam Paper Leak प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही कुलकर्णी यांना अटक केली आहे. तपासादरम्यान कुलकर्णी हे या संपूर्ण गैरप्रकारामागील प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीसाठी दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Raja Shivajiचा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिसवर गाजलं, पाहा आतापर्यंत किती झाली कमाई!

कोण आहेत पी. व्ही. कुलकर्णी?

पी.व्ही कुलकर्णी हे केमेस्ट्री विषयाचे अनुभवी प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लातूरमधील दयानंद कॉलेज येथे जवळपास तीन दशके अध्यापन केलं होतं. मेडिकल प्रवेश परीक्षा आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची विशेष ओळख होती. काही वर्षांपूर्वी निवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्यास होते आणि खासगी मार्गदर्शन वर्गांद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्कात होते.

प्रश्नपत्रिका समितीशी संबंध

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कुलकर्णी हे National Testing Agencyच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्रक्रियेशी संबंधित होते. या माध्यमातून त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील संवेदनशील माहितीपर्यंत पोहोच मिळाल्याचा संशय आहे. याच प्रवेशाचा गैरफायदा घेत केमिस्ट्री विषयाची माहिती परीक्षेपूर्वी बाहेर पोहोचवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विषयानुसार पेपर लीकचा संशय

सीबीआयच्या प्राथमिक तपासात आरोपींनी वेगवेगळे विषय वाटून घेतल्याचं समोर आलं आहे. रसायनशास्त्रातील तज्ज्ञ असल्याने कुलकर्णी यांच्यावर केमिस्ट्री विभागाची जबाबदारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर इतर आरोपींकडून बायोलॉजी आणि इतर विषय हाताळले जात होते. तपास यंत्रणांच्या मते, संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाचवेळी न फोडता विषयनिहाय माहिती वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात होती.

आर्थिक व्यवहारांवरही चौकशी

या प्रकरणात पुण्यातील मनीषा वाघमारे नावाच्या महिलेच्या माध्यमातून काही विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. तपासात मोठ्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरेही हाती लागले असून, या व्यवहारांतून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे.

देशभरात कारवाई

या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत. शिक्षण क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts