AIBE 21 Admit Card 2026: ऑल इंडिया बार परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया ते कुठे आणि कसे डाउनलोड करायचे.
ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) 21 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार ते अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वरून डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा ७ जून २०२६ रोजी आरोजित केली जाणार आहे. प्रवेशपत्रांशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
हेही वाचा: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’चा दबदबा; राजा शिवाजी’चा 21 दिवसांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता…
बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) तर्फे घेण्यात येणाऱ्या AIBE परीक्षेचे प्रवेशपत्र आता उपलब्ध झाले आहे. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे.
तसेच उमेदवारांनी शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणीटाळण्यासाठी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. डाउनलोड करण्याची सुविधा परीक्षा दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.
महत्वाच्या तारखा
Admit Card जाहीर झाल्याची तारीख: २२ मे २०२६
परीक्षेची तारीख: ७ जून २०२६
परीक्षेची वेळ: दुपारी १:०० ते दुपारी ४:०० पर्यंत (उमेदवारांना सकाळी ११:३० वाजल्यापासून केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे).
AIBE 21 Admit Card कसे डाऊनलोड करावे?
अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com ला भेट द्या
होमपेजवरील ‘AIBE Admit Card 2026’ पर्याय निवडा
लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका
सबमिट करा आणि प्रवेशपत्र उघडा
सर्व माहिती नीट तपासा
डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा
प्रवेशपत्रात कोणती माहिती चेक करावे?
उमेदवाराचे नाव
रोल नंबर व हॉल तिकीट क्रमांक
परीक्षा तारीख व वेळ
परीक्षा केंद्राचे तपशील
रिपोर्टिंग वेळ
परीक्षा संबंधित नियम व सूचना
उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. कोणतीही चूक आढळल्यास त्वरित बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) च्या हेल्पडेस्कशी संपर्क साधावा. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.






