Drishyam 3 Box Office: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि प्रमुख भूमिकेत असलेला ‘ राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या २१ दिवसांत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित या चित्रपटाने सुरुवातीपासूनच तुफान कमाई केली. देशभरासह परदेशातही चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, अनेक विक्रम मोडत हा सिनेमा यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. मात्र, तिसऱ्या आठवड्यात चित्रपटात कमाईचा वेग काहीसा मंदावला आहे. त्यातच मोहनलाल यांच्या ‘‘दृश्यम 3’ च्या रिलीजमुळे आता स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.
हेही वाचा: सिंह राशीत चंद्राचे गोचर, या 3 राशींवर होणार धनवर्षाव; ‘ही’ चूक करू नका!
राजा शिवाजी २१ दिवसांची कमाई
‘राजा शिवाजी’ने आतापर्यंत जागतिक बॉक्स ऑफिसवर तब्बल ११०.१० कोटी रुपये कमावले आहेत. भारतातील नेट कलेक्शनचा आकडा ८९.५५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २१ व्या दिवशी चित्रपटाने सुमारे ९९ लाख रुपयांची कमाई केली.
तिसऱ्याया आठवड्यात चित्रपटाने एकूण १२ कोटी रुपये जमा केले. विशेष म्हणजे मराठी चित्रपटासाठी ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे.
स्टारकास्टमुळे वाढली उत्सुकता
या सिनेमात रितेश देशमुखसोबत जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि जितेंद्र जोशी यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत. दमदार स्टारकास्ट आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
एकूण कलेक्शन
पहिला आठवडा – 7.70 कोटी
दुसरा वीकेंड – 17.40 कोटी
11वा दिवस – 2.65 कोटी
12वा दिवस – 2.75 कोटी
13वा दिवस – 2.10 कोटी
14वा दिवस – 2.10 कोटी
15वा दिवस – 1.45 कोटी
16वा दिवस – 2.70 कोटी
17वा दिवस – 3.45 कोटी
18वा दिवस – 1.15 कोटी
19वा दिवस – 1.30 कोटी
20वा दिवस – 1.10 कोटी
21वा दिवस – 0.99 कोटी
‘दृश्यम 3’ची जोरदार सुरुवात
दरम्यान, मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा विक्रम केला आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर 43.37 कोटी रुपयांची ओपनिंग घेतली. त्यापैकी सुमारे 25 कोटी रुपयांची कमाई परदेशातून झाली आहे.












