Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

दिल्लीत अग्नितांडव, २१ नागरीकांचा होरपाळून भयानक शेवट

Delhi Fire Tragedy 21 Dead

Delhi Fire Tragedy 21 Dead : दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात बुधवारी ३ जून सकाळी एका हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत आतापर्यंत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. लेमन ग्रीन (Lemon Green) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये प्रथम आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे स्वयंपाकघरात आग भडकल्याचे प्राथमिक माहिती आहे. आग वेगाने वरच्या मजल्यावरील हॉटेलच्या खोल्यांपर्यंत पसरली. इमारतीत आग पसरताच बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने अनेक लोक अडकले.

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. बचाव पथकांनी ३७ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, आगीच्या धुरामुळे आणि ज्वाळांमुळे अनेकांना खिडक्या, बाल्कनी आणि वरच्या मजल्यावरून खाली उड्या माराव्या लागल्या. स्थानिक रहिवाशांनी जमिनीवर गाद्या टाकून बचावाची व्यवस्था केली होती.

प्रत्यक्षदर्शींची धक्कादायक माहिती

प्रत्यक्षदर्शी ओम यांनी सांगितले की, सकाळी ९.३० च्या सुमारास संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आली होती. “अनेक जण इमारतीवरून उड्या मारताना दिसले. एका व्यक्तीचा पाय तुटल्याचेही पाहिले. परिस्थिती अत्यंत भयावह होती. सर्वत्र धूर, ज्वाळा आणि आरडाओरडा होता,” असे त्यांनी वर्णन केले. मालवीय नगरचे माजी आमदार सोमनाथ भारती यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, आग प्रथम रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात लागली आणि ती वेगाने पसरली. त्यांनी दिल्ली सरकारकडे मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाची कारवाई

या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासनाने निवासी भागांमध्ये चालणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दिलेल्या परवान्यांची माहिती मागितली आहे. अशा सर्व आस्थापनांची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. घटनास्थळी अद्याप बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाने आगीचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts