Delhi Airport | दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi Indira Gandhi International Airport) एक थरारक अशी घटना घडली. एअर इंडियाच्या (Air India) एका विमानाला उड्डाणादरम्यान अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. यावेळी विमानात 171 प्रवासी होते. तर विमानाला आग लागल्यामुळे विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची घटना घडली.
हेही वाचा – “मी जातीसाठी माती खायला तयार…”; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य, जरांगेंच्या सर्व मागण्या पूर्ण होणार?
दिल्ली विमानतळावर नेमकं घडलं काय?
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरुहून दिल्लीला जाणाऱ्या AI-2802 हे विमान दिल्लीत उतरण्याच्या अंतिम टप्प्यात असताना, कॉकपिटमधील कर्मचाऱ्यांना एका इंजिनला आग लागल्याचा संकेत मिळाला. नंतर हा संकेत अचूक असल्याचे आढळून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व प्रमाणित कार्यपद्धतींचे पालन करून दिल्ली विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. या घटनेत सुदैवानं सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून ते सुरक्षितरीत्या विमानातून उतरले आहेत, अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.
We are aware of an incident involving flight AI2802 operating from Bengaluru to Delhi on 21 May 2026. The aircraft landed safely and all passengers and crew are safe.
We are currently gathering additional information and are working closely with the relevant authorities.…
— Air India (@airindia) May 21, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया विमानाच्या इंजिनला अचानक आग लागल्याने त्या विमानाचे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनाने ते धावपट्टीवरून ओढून बाहेर काढले. विमानाच्या इंजिनला आग लागल्याचे एअरलाइनने नंतर सांगितले. ही घटना दिल्ली विमानतळावर रात्री 9:30 वाजता घडली.
या घटनेबाबत एअरलाइनने म्हटलं आहे की, एअर इंडिया संबंधित नियामक प्राधिकरणांच्या समन्वयाने या घटनेच्या कारणांची तातडीने सखोल चौकशी सुरू करत आहे. आम्हाला अधिक सत्यापित माहिती मिळताच ती कळवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.












