Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजस्थानच्या पाचपद्रा रिफायनरीमध्ये भीषण आग; उद्या पंतप्रधान मोदी करणार होते उद्घाटन
गुन्हा

राजस्थानच्या पाचपद्रा रिफायनरीमध्ये भीषण आग; उद्या पंतप्रधान मोदी करणार होते उद्घाटन

राजस्थानच्या पाचपद्रा रिफायनरीमध्ये भीषण आग; उद्या पंतप्रधान मोदी करणार होते उद्घाटन

Massive Fire : राजस्थानच्या बालोत्रा ​​जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज पाचपद्रा रिफायनरीच्या सीडीयू युनिटमध्ये भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, त्यामुळं संपूर्ण परिसरात तात्काळ घबराट पसरली. घटनास्थळी मोठ्या संख्येनं अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

हेही वाचा : “भारत शांततेच्या बाजूने…”, मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

दूरवरुन दिसत होतो धुराचे लोट :

प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग लागल्यानंतर रिफायनरीच्या आवारात दूरदूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. आगीचं नेमकं कारण सध्या अज्ञात आहे, परंतु प्रशासन आणि तांत्रिक पथक या घटनेचा तपास करत आहे. ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे, कारण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिफायनरीचं उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्रीही आज दुपारच्या सुमारास रिफायनरीला भेट देणार होते. या घटनेमुळं सुरक्षा व्यवस्था आणि तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.

मुख्यमंत्री आज संध्याकाळी देणार भेट :

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील आज संध्याकाळी रिफायनरीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या रिफायनरीचं उद्घाटन करणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुढील माहितीची प्रतीक्षा असून नुकसानीच्या प्रमाणाचा अंदाज घेतला जात आहे. प्राथमिक अहवालानुसार, रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये आग लागली.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts