Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • बरं झालं देवाने मला मुलगी दिली नाही…! कॉमेडियन भारती सिंहने केले हे वक्तव्य
मनोरंजन

बरं झालं देवाने मला मुलगी दिली नाही…! कॉमेडियन भारती सिंहने केले हे वक्तव्य

bharati singh glad to no have baby girl

Bharti Singh statement : कॉमेडी क्वीन भारती सिं ही नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असते. तिने तिच्या कॉमेडीने सर्व चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. भारतीने सोशल मीडियावर तिला मुलगी हवी आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता तीने मुलींबाबत एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे आता ती चांगलीच चर्चेत आली आहे.

भारती सिंहला यापूर्वी एक मुलगा आहे. ज्याचे नाव गोला असून तो देखील सोशल मीडियावर फार फेमस आहे. भारती सिंह सोशल मीडियावर ब्लॉग च्या माध्यमातून अनेकदा मुलगी हवी असं म्हणताना दिसली. परंतु भारतीला मुलगी नाही तर मुलगा झाला. परंतु ती आता याउलट बोलताना दिसली.

हे ही वाचा : द कपिल शर्मा शोमध्ये जज म्हणून काम करणाऱ्या अर्चना पुरण सिंहला गंभीर आजाराने घेरले; मुलाने दिली माहिती

हे दुःख माझ्याकडून सहन झाले नसते

भारती म्हणते, देवाची मी खरोखरच मनापासून भारी आहे. मला दोन मुलं दिली… परंतु मला मुलगी दिली नाही, कारण तिचे संगोपन करून तिला लहानाचे मोठे करायचं. आणि तिचे लग्न करून तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं हे दु:खच माझ्याकडून सहन झाले नसते. त्यामुळे ज्यांना मुली आहेत ते आई वडील खरच धन्य आहे. जेव्हा गोला मला फक्त घर सोडून जातो असं बोलला तेव्हा मला काही कळत नव्हते, मी प्रचंड भावूक झाले होते. मुलींना लग्न करून सासरी पाठवणे कठीण काम असून माझे दोन डोळे माझे गोला आणि काजू आहेत. मी आता दोन मुलांची आई झाली आहे….असं वक्तव्य भारतीने केले.

मुलं आई वडिलांना सोडून देतात

मुले आईवर जास्त प्रेम करतात आणि मुली या वडिलांव जास्त प्रेम करतात असं मी ऐकलं होतं. त्यामुळेच हर्षला मुलगी हवी होती. काजूला सांभाळत असताना भारती सिंह म्हणते की, गोला लहानाचा मोठा कसा झाला हे काही समजलंच नाही. गोला बाळासारखा कधी राहिलाच नाही. परंतु दुसरा मुलगा काजू बऱ्यापैकी मुलांसारखा राहतो, वागतो. मुलं आईवडिलांना सोडून देतातते चुकीचे आहे असं देखील भारती म्हणाली.

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव लक्ष लिंबाचिया असून त्याला लाडाने गोला म्हंटले जाते. भारती सोबतच गोला देखील फेमस आहे. तर आता त्यांना दुसरा देखील मुलगा झाला असून त्याचे टोपण नाव काजू ठेवण्यात आले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts