Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर उतरला निवडणुकीच्या रिंगणात; आज भरला उमेदवारी अर्ज
Top News

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर उतरला निवडणुकीच्या रिंगणात; आज भरला उमेदवारी अर्ज

Notorious Pune gangster Bandu Andekar arriving to file his nomination for the elections

Bandu Andekar election nomination : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशित पत्रे भरण्यात येत आहे. आज पुण्यातील कुख्यात गुंड तथा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बघायला मिळाला. तसेच अर्ज भरण्यासाठी त्याची पोलीस व्हॅनमधून सिनेस्टाईल एन्ट्री पाहायला मिळाली.

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोलिसांसह तो दाखल झाला. यावेळी त्याच्या गळ्यात दोर असल्याचे दिसून आले. आता हा म्होरक्या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. निवडणुकीसाठी फक्त बंडू आंदेकरने नाही तर त्यांच्या कुटुंबील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. पोलिसांच्या बंदोबस्तात या कुटुंबाला अर्ज भरण्यासाठी नेण्यात आले. यावेळी त्याचा चेहरा काळ्या रंगाच्या कापडाने लपेटलेला होता. तर गळ्यात दोर बांधलेला दिसला.

नेकी का काम आंदेकर का काम

यावेळी मी उमेदवार म्हणत बंडू आंदेकर याने घोषणाबाजीही केली. नेकी का काम आंदेकर का काम, बघा बघा मला लोकशाहीत कसं अणलय, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत, मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही. वनराज आंदेकर जिंदाबाद, अशी घोषणाबाजी बंडू आंदेकरने यावेळी केली. त्याच्या आधी सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती.

हे ही वाचा : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज भरणार उमेदवारी अर्ज; लढवणार महापालिका निवडणूक

निवडणूक लढवण्यासाठी काही अटी 

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात बंडू आंदेकर यांनी आयुष्य कोमकर याची हत्या केली होती. त्यानंतर बंडू आंदेकर यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. आता बंडू आंदेकर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. यासाठी आंदेकर यांना सत्र न्यायालयाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. आंदेकरला निवडणूक लढवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या. त्यानुसार कोणत्याही प्रकारची मिरवणूक, प्रचार यात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषण करण्यास न्यायालयाने बंदी घालत ताकीद दिली आहे.

काय म्हणाले न्यायालय

वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सुद्धा न्यायालयास महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. निवडणूक लढवण्यासाठी पुण्याच्या मोक्का न्यायालयाने सुद्धा परवानगी दिली. कोठडीत असून देखील निवडणूक लढवण्यास परवानगी मिळावी अशी वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांची इच्छा होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात अर्ज सादर केला. आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी केली. आणि वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर याना महापालिका निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts