Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मनोज जरांगे उन्हात, तर लक्ष्मण हाके ढेकळात उपोषणाला बसणार; आरक्षणाचा संघर्ष पेटणार
Top News

मनोज जरांगे उन्हात, तर लक्ष्मण हाके ढेकळात उपोषणाला बसणार; आरक्षणाचा संघर्ष पेटणार

Jarange Hake Hunger Strike

Jarange Hake Hunger Strike : सध्या महाराष्ट्रात काय चाललंय? पाऊस पडायच्या आधीच समाजकारण आणि राजकारण असं तापलंय की जणू काय वैशाखात वणवा पेटलाय. एका बाजूला मराठा आरक्षणाचे आक्रमक आदोलनकर्ते मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाच्या मैदानात उतरलेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचे आक्रमक लढवय्ये नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर जोरदार शाब्दिक बाण चालवलेत. आता ही लढाई फक्त आरक्षणाची राहिलेली नाही, तर ती आता बाजेवरून ढेकळापर्यंत आलीये.

मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केलंय, मात्र लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना ओपन चॅलेंज दिलंय. तुम्ही बाजावर बसून उपोषण केलं आहे तर उद्या आम्ही ढेकळाट बसून उपोषण करू. त्यामुळे हा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र एका वेगळ्याच सामाजिक वळणावर येऊन उभा राहिला आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन रेल्वे रुळांसारख्या समांतर चालणाऱ्या गोष्टी आता एकमेकांसमोर आल्यात.

तळपत्या उन्हामध्ये मनोज जरांगे उपोषण सुरु

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सगेसोयरे कायद्याच्या माध्यमातून म्हणजेच ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून कंबर कसली आहे. आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावर आक्षेप घेत ओबीसींच्या ताटात येऊ नका म्हणू जोरदार विरोध केलाय. जरांगेयांचे अंतरवली सराटीत उपोषण सुरु आहे, कोणताही मंडप न टाकता तळपत्या उन्हामध्ये मनोज जरांगे उपोषण सुरु केलंय, जरांगे यांनी बाजावर बसून उपोषण सुरु केलंय. तर या उपोषणाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी चालेंज केलंय. लक्ष्मण हाके हे सुद्धा उद्या ढेकलात बसून आंदोलन करणार आहेत, उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख वेळ ते जाहीर करणार आहेत असं स्वतः हाके यांनी सांगितलंय.

या संघर्षात विजय कुणाचा होईल हे काळच सांगेल

शेवटी आरक्षण हा मुद्दा भावनिक कमी आणि तांत्रिक जास्त असायला हवा. पण सध्या ते बाजा आणि ढेकळांमध्ये अडकलंय. लक्ष्मण हाके यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा हा ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं ते सांगतात. तर जरांगे ही मराठा समाजाच्या भविष्याची लढाई असल्याचं मानतात. या संघर्षात विजय कुणाचा होईल हे काळच सांगेल, पण सध्या तरी जरांगेंच्या उपोषणाने सरकारला घाम फोडला आहे, आणि लक्ष्मण हाकेंच्या त्या ढेकळात बसून आंदोलन करू या विधानाने सरकार मेटाकुटीला येणार हे नक्कीच.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts