Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • कर्नाटकात राजकीय भूकंप? मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा काँग्रेसने घेतला राजीनामा
Top News

कर्नाटकात राजकीय भूकंप? मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा काँग्रेसने घेतला राजीनामा

Karnataka Political Crisis

Karnataka Political Crisis : कर्नाटकच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यात अनेकदा वाद पाहयला मिळत होते. डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनायचे होते. मात्र जातीय समीकरणे आणि काँग्रेसमधील गटबाजीमुळे शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सोपा नव्हता. पण आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. सकाळी आपल्या निवासस्थानी आयोजित ‘पॉवर ब्रेकफास्ट’ बैठकीत त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पद सोडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत हे इंदूरमध्ये असल्याने सिद्धरामय्या यांनी आपला राजीनामा ‘लोकभवन’ येथे राज्यपालांच्या विशेष सचिवांकडे सुपूर्द केला. या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

कर्नाटकात 2023 मध्ये काँग्रेसला बहूमत मिळाल्यापासून सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्या गटात मुख्यमंत्रीपादवरुन रस्सीखेच पाहायला मिळत होती .मात्र काँग्रेस हायकमांडने आणि राहुल गांधी यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यावेळी राहुल गांधी, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात बंद दाराआड ‘अडीच-अडीच वर्षांचा’ सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. सरकारला ३ वर्षे पूर्ण होताच शिवकुमार गटाने या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी हायकमांडवर दबाव वाढवला होता, अशी माहिती आहे.

हायकमांडने सिद्धरामय्या यांना सत्ता बदल मान्य करायला लावला

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने दोन्ही गटात अनेकदा मोठा वाद झाल्याची माहिती आहे. गेल्या ३ वर्षांत दोन्ही नेत्यांमधील वाद इतका विकोपाला गेला होता की, काँग्रेस राष्ट्रीयअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना अनेकवेळा मध्यस्थी करावी लागली, अशी माहिती आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून सातत्याने “पुढचे मुख्यमंत्री आमचेच नेते असतील” अशी जाहीर विधाने केली जात होती. हा वाढता वाद पाहता आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचं सरकार बनवण्यासाठी काँग्रेसने सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे. यासाठी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत हायव्होल्टेज बैठकही झाली. हायकमांडने सिद्धरामय्या यांना सत्ता बदल मान्य करायला लावून हा वाद अंतिम स्तरावर मिटवला, अशी चर्चा आहे.

समर्थकांनी गराडा घालत राजीनामा न देण्याच्या घोषणा दिल्या

सिद्धरामय्या जेव्हा राजीनामा देण्यासाठी लोकभवनकडे निघाले, तेव्हा त्यांच्या गाडीला समर्थकांनी गराडा घातला आणि “राजीनामा देऊ नका” अशा घोषणा दिल्या. सिद्धरामय्या यांचे समर्थक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. दुसरीकडे, डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारून पक्षात एकजूट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. शिवकुमार मुख्यमंत्री होणार असल्याने यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष सुरू केला आहे.

सिद्धरामय्या स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मांडणार

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस आमदारांची अधिकृत बैठक बेंगळुरूमध्ये होणार आहे. या बैठकीत सिद्धरामय्या स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील, अशी माहिती आहे. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन काँग्रेसचे नेते राज्यपालांची भेट घेतील. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री म्हणून अधिकृत शपथविधी पार पडेल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts