Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा सौदा! 15,660 कोटी रुपयांमध्ये उद्योगपतींनी केलं खरेदी
क्रीडा

राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा सौदा! 15,660 कोटी रुपयांमध्ये उद्योगपतींनी केलं खरेदी

राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा सौदा! 15,660 कोटी रुपयांमध्ये उद्योगपतींनी केलं खरेदी

जयपूर Rajasthan Royals : उद्योगपती लक्ष्मी मित्तल आणि आदित्य मित्तल यांनी आदर पूनावाला यांच्यासोबत आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचं अधिग्रहण केलं आहे. या अधिग्रहणामुळं ते फ्रँचायझीचे नवीन मालक बनतील. मित्तल कुटुंबानं 3 मे रोजी जाहीर केलं की, आदर पूनावाला यांच्या भागीदारीत मनोज बदाळे आणि त्यांच्या गटाकडून राजस्थान रॉयल्सचं अधिग्रहण करण्यासाठी अंतिम करार झाला आहे. हा करार 15,660 कोटी रुपयांमध्ये झाला आहे.

हेही वाचा : राज्यात महिला असुरक्षित मुख्यमंत्री निवडणुक प्रचारात व्यस्त; नसरापूर घटनेवरुन संजय

नवीन मालकी हक्कात कोणाकडे किती हिस्सा :

या नवीन करारानंतर राजस्थान रॉयल्सच्या संचालक मंडळाची रचना पूर्णपणे बदलेल. संघात मित्तल कुटुंबाकडे 75 टक्के बहुसंख्य हिस्सा असेल. सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्याकडे 18 टक्के हिस्सा असेल. तर सध्याचे मालक मनोज बदाळे आणि इतर अनेक गुंतवणूकदारांकडे उर्वरित 7 टक्के हिस्सा असेल. जुन्या आणि नवीन व्यवस्थापनामध्ये समन्वय राखण्यासाठी मनोज बदाळे संघासोबत जोडलेले राहतील.

संपूर्ण रॉयल्स संघ केले खरेदी :

ही 15,660 कोटी रुपये किंमत केवळ आयपीएल संघासाठी नाही. राजस्थान रॉयल्सच्या मालकीचे जगातील आणखी दोन मोठे संघ आहेत, दक्षिण आफ्रिकेचा पार्ल रॉयल्स आणि कॅरिबियन प्रीमियर लीगचा बार्बाडोस रॉयल्स. या करारामध्ये या तीन संघांचं एकत्रित मूल्य समाविष्ट आहे. मात्र, याच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलसारख्या प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक आहे, ज्यासाठी 2026 च्या अखेरपर्यंत वेळ लागू शकतो.

संघ घेतल्यावर लक्ष्मी मित्तल काय म्हणाले :

संघ विकत घेतल्यानंतर, लक्ष्मी निवास मित्तल म्हणाले की त्यांचं कुटुंब मूळचं राजस्थानचं आहे, त्यामुळं राजस्थान रॉयल्स त्यांच्यासाठी केवळ एक संघ नसून एक भावना आहे. ते म्हणाले, “या महान संघाचा भाग बनून मी खूप उत्साहित आहे आणि चाहत्यांसोबत मैदानाबाहेरुन संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे.” दरम्यान, आदित्य मित्तल म्हणाले की, त्यांना राजस्थान रॉयल्सचा नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा वारसा पुढे न्यायचा आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts