बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या १४ वर्षाच्या संसारात वादळं आलं आहे. तिने पती पीटर हागवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई तसेच मुलाचा ताबा मागितली आहे. सेलिना आणि पीटर यांचं २०१० मध्ये लग्न झालं. त्यांना १४ वर्षाच्या दीर्घकालीन संसारापासून तीन अपत्य आहेत. असे असताना आता मात्र या दाम्पत्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलिनानं पीटरवर भावनिक, शारीरिक, लैंगिक आणि शाब्दिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई न्यायालयात याचिका दाखल
सेलिना जेटलीनं २१ नोव्हेंबर रोजी मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार, पीटर हाग एक स्वार्थी आणि सहानुभूती नसलेली व्यक्ती आहे. सेलिनानं पीटरच्या त्रासामुळं ऑस्ट्रियातील घर सोडून भारतात परत आल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा – धर्मेंद्र यांच्या मालमत्तेचे होणार किती हिस्से; कोण होणार वारसदार
पीटरकडून दरमहा १० लाख रुपये पोटगीची मागणी
सेलिनानं पीटरवर आरोप केला आहे की, मुलं झाल्यानंतर पीटरनं तिला काम करण्यापासून रोखलं. यामुळे तिची आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा हिरावली गेली. ती केवळ पीटरच्या परवानगीनेच छोटी-मोठी कामं करू शकत होती. सेलिनान पीटरकडून दरमहा १० लाख रुपये पोटगीची मागणी केली आहे. तसंच, पीटरला तिच्या मुंबईतील घरात प्रवेश करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. सध्या तिची तीन मुले ऑस्ट्रियामध्ये पीटरसोबत राहत आहेत आणि सेलिनानं त्यांची कस्टडी मागितली आहे.
#WATCH | Delhi | Advocate Niharika Karanjawala, counsel for Celina Jaitly, says, “Yes, we filed a complaint under the Domestic Violence Act for cruelty and domestic violence, both physical and emotional, that has lasted for many years through Miss Chaitley’s marriage with Mr… https://t.co/NjP0SCzBJd pic.twitter.com/cuvXJV4Wp5
— ANI (@ANI) November 25, 2025
एका मुलाचा जन्मजात हृदयविकारामुळं मृत्यू
पीटर हागनं यावर्षी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रियातील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सेलिना जेटली आणि पीटर हाग यांना २०१२ मध्ये जुळी मुले झाली. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांना आणखी जुळी मुले झाली, त्यापैकी एकाचा जन्मजात हृदयविकारामुळं मृत्यू झाला.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सेलिना जेटलीची पीटरसाठी भावनिक पोस्ट
सेलिना जेटलीनं गेल्या वर्षी तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पीटरसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. १४ वर्षांपूर्वी आज पीटर हाग माझ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी फक्त ८ तासांसाठी मुंबईत आला होता (दुसऱ्या दिवशी त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती). मला माहीत नव्हतं की त्यानं माझ्या वडिलांकडं मला लग्नाची मागणी घालण्याची परवानगी मागितली होती… त्याच रात्री निघण्यापूर्वी त्यानं मला अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली, असं तिनं इंस्टाग्रामवर लिहिलं होतं.








