Narhari Zirwal | राज्याचे अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरहरी झिरवाळ हे एका ट्रान्सझेंडर व्यक्तीसोबत दिसत आहेत. हा व्हिडीओ शासकीय निवासस्थानातील असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर झिरवाळ यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात खळबळ! ढोंगी खरातच्या संपर्कात होती आमदाराची बायको? तपासात झाला धक्कादायक खुलासा
नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कुणी केला रेकॉर्ड?
बुधवारी नरहरी झिरवाळ यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिछान्यावर झोपलेल्या नरहरी झिरवाळ यांच्यासोबत त्यांच्या शेजारी एका ट्रान्सजेंडर व्यक्ती देखील दिसत आहे. तसेच त्यांच्या रूमध्ये काही पदार्थ आणि मद्याची बाटलीही दिसत आहे. तर या व्हिडीओत नरहरी झिरवाळ हे अर्धनग्न अवस्थेत बिछान्यावर झोपलेले दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारी ट्रान्सजेंडर व्यक्ती झोपलेली दिसत आहे. हा आक्षेपार्ह व्हिडीओ शासकीय विश्रामगृहातील असल्याचं सांगितलं जात आहे.
झिरवाळ यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ नेमका कोणी रेकॉर्ड केला? असा सवाल उपस्थित केला जात होता. तर आता याबाबतचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कोणी शूट केला ही बाब आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कथित आक्षेपार्ह व्हिडीओत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत ट्रान्सवूमन होती. या ट्रान्सवूमनचं नाव पवन यादव असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ट्रान्सवूमन पवन यादवनेच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती पवन यादवचा भाऊ रवी यादवने लोकशाही मराठी चॅनलसोबत बोलताना दिली आहे.
रवी यादवने सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडीओत मंत्री नरहरी झिरवाळ दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत माझा भाऊ पवन यादव आहे. हा व्हिडीओ पवननेच रेकॉर्ड केला होता. तर नरहरी झिरवाळ यांनी अनेकदा पवनसोबत अनैतिक संबंध ठेवले होते, असा दावा रवी यादवने केला आहे. तर पवनला सरकारच्या तृतीयपंथी बोर्डात मोठे पद हवे होते, त्यामुळे त्याचे आणि नरहरी झिरवाळ यांचे जवळचे संबंध होते, असा धक्कादायक खुलासाही रवी यादवने केला आहे.
दरम्यान, रवी यादवने केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर या कथित व्हायरल व्हिडीओनंतर विरोधकांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.












