Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! ट्रम्प यांच्या विनंतीवरुन इराणनं 8 महिलांच्या फाशीची शिक्षा थांबवली, नेमकं प्रकरण काय?
ताज्या बातम्या

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! ट्रम्प यांच्या विनंतीवरुन इराणनं 8 महिलांच्या फाशीची शिक्षा थांबवली, नेमकं प्रकरण काय?

Donald Trump protest

Middle East Tensions : मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांच्या हस्तक्षेपामुळं इराणमध्ये फाशीची शिक्षा भोगत असलेल्या आठ महिला आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी या बातमीला “खूप चांगली बातमी” म्हटलं आहे आणि सांगितलं की, या महिला आंदोलकांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! भारताकडे जाणाऱ्या जहाजावर आयआरजीसीचा होर्मुझमध्ये हल्ला; जहाज जप्त

इराणच्या नेतृत्वाचे आभार :

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या आठ महिलांपैकी चौघींना तात्काळ सोडण्यात येईल, तर उर्वरित चौघींना एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येईल. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, इराणच्या नेतृत्वानं त्यांचं आवाहन मान्य करून प्रस्तावित फाशीची शिक्षा रद्द केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी इराण आणि तेथील नेत्यांचे आभारही मानले.

इराणनं ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिला नाही :

मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे. याबाबत इराणकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतरच घेण्यात आला की यामागे इतर अंतर्गत किंवा राजनैतिक कारणे आहेत, हे अस्पष्ट आहे.

मानवाधिकार संघटना इराणवर लक्ष ठेवून :

हे लक्षात घेण्यासारखं आहे की मध्य-पूर्वेत आधीच तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि अशा बातम्यांचा प्रादेशिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो. अनेक मानवाधिकार संघटना देखील इराणमधील या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण इराणी राजवटीने आंदोलकांवर केलेल्या कठोर कारवाईबद्दल यापूर्वी चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, जर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खरा ठरला, तर ही एक महत्त्वपूर्ण राजनैतिक घडामोड मानली जाईल. सध्या, संपूर्ण जग या प्रकरणी इराणी सरकारच्या प्रतिक्रियेकडे लक्ष ठेवून आहे.

 

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts