Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजपची 17 पैकी बहुतांश जागांवर पकड; महायुतीत जागावाटपावरून तणाव, कोणाला किती वाटा?
महाराष्ट्र

भाजपची 17 पैकी बहुतांश जागांवर पकड; महायुतीत जागावाटपावरून तणाव, कोणाला किती वाटा?

Maharashtra Politics: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदार होणार असून २२ जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची ताकद आणि संभाव्य निकालाचे गणित समोर येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार १७ पैकी सुमारे १४ मतदारसंघांमध्ये भाजपची (BJP) स्थिती मजबूत असल्याचे दिसत आहे.

शिवसेना (Shiv Sena) एका मतदारसंघात आघाडीवर असल्याचे दिसते, तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी प्रभावी स्थितीत आहे. रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे शिवसेना मजबूत आहे, तर पुणे आणि परभणी- हिंगोली येथे राष्ट्रवादीकडे तुलनेने अधिक मते आहेत.

हेही वाचा: देशभरातील पुढील 72 तास धोक्याचे! अनेक राज्यांत वादळी पावसाचा इशारा

महायुतीत जागावाटपावर तणाव (Mahayuti seat)

महायुतीतील घटक पक्षांमध्ये काही मतदारसंघांवरून मतभेद उघड झाले आहेत.

पुण्यात राष्ट्रवादीकडे स्वतंत्रपणे जास्त मते असली तरी भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांची ताकद अधिक होते. त्यामुळे भाजपने या जागेवर दावा केला आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेना मजबूत असूनही राष्ट्रवादीकडून ही जागा मागितली जात आहे. त्याच्या बदल्यात शिवसेनेकडून परभणी-हिंगोली मतदारसंघाची मागणी होत असल्याची चर्चा आहे.

या सर्व घडामोडींमुळे अंतिम जागावाटप कसे होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या गणितानुसार भाजपकडे बहुतांश जागा जाण्याची शक्यता असली तरी सहयोगी पक्षांना समाधान देण्यासाठी भाजपकडून काही जागा सोडण्याची तयारी दाखवली जात असल्याचे संकेत आहेत.

मतदारसंघनिहाय पक्षीय ताकद

ठाणे – भाजप 431 | शिवसेना 309 | राष्ट्रवादी 18
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – भाजप 241 | शिवसेना 275 | राष्ट्रवादी 149
अहिल्यानगर – भाजप 207 | शिवसेना 44 | राष्ट्रवादी 64
जळगाव – भाजप 274 | शिवसेना 208 | राष्ट्रवादी 55
नाशिक – भाजप 186 | शिवसेना 161 | राष्ट्रवादी 107
सोलापूर – भाजप 304 | शिवसेना 76 | राष्ट्रवादी 48
सांगली-सातारा – भाजप 371 | शिवसेना 110 | राष्ट्रवादी 145
पुणे – भाजप 335 | शिवसेना 82 | राष्ट्रवादी 375
यवतमाळ – भाजप 135 | शिवसेना 104 | राष्ट्रवादी 29
भंडारा-गोंदिया – भाजप 196 | शिवसेना 15 | राष्ट्रवादी 83
वर्धा-चंद्रपूर-गोंदिया – भाजप 149 | शिवसेना 1 | राष्ट्रवादी 15
अमरावती – भाजप 136 | शिवसेना 23 | राष्ट्रवादी 83
धाराशिव-लातूर-बीड – भाजप 379 | शिवसेना 80 | राष्ट्रवादी 202
परभणी-हिंगोली – भाजप 111 | शिवसेना 74 | राष्ट्रवादी 123
छत्रपती संभाजीनगर-जालना – भाजप 254 | शिवसेना 139 | राष्ट्रवादी 86
नागपूर – भाजप 501 | शिवसेना 30 | राष्ट्रवादी 5

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts