Sai Tamhankar Pondicherry Marathi Movie: मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक हटके चित्रपट आता YouTube वर उपलब्ध झाला आहे. चला तर जाणून घेऊया या चित्रपटात काय खास आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी एक खास फिलगुड अनुभव देणारा हा चित्रपट आता थेट यूट्यूबवर उपलब्ध झाला आहे. चित्रपटाच्या नावापासूनच प्रेक्षकांना एक वेगळाच फ्रेश अनुभव मिळतो. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, मीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांच्या अभिनयाने सजलेला हा फिलगुड चित्रपट 1 तास 51 मिनिटांचा असून आता तो YouTube वर उपलब्ध आहे.
चित्रपटाचा नाव काय?
हा चित्रपट ‘पाँडिचेरी’ असून तो दिग्दर्शक Sachin Kundalkar यांचा आहे. यात प्रमुख भूमिकेत Sai Tamhankar दिसते. कथेचा केंद्रबिंदू तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हरवलेलं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीतरी तुटलेल्या नात्याच्या वेदनेत अडकलेलं आहे, कोणीतरी बेपत्ता जोडीदाराच्या प्रतीक्षेत जगत आहे, तर कोणीतरी कुटुंबाच्या अपेक्षांमुळे चुकीच्या नात्यात अडकण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे.
काय आहे कथा
कथेचा केंद्रबिंदू निकिता आणि तिचा मुलगा ईशान यांचं आयुष्य आहे. निकिता होमस्टे चालवत असून टूर गाईडचं कामही करते. वरकरणी तिचं आयुष्य स्थिर वाटत असलं तरी नवऱ्याच्या अनुपस्थितीमुळे तिच्या आयुष्यात एक रिक्तता जाणवत राहते. आईची चिंता, एकटीची जबाबदारी आणि नात्यांमधील गुंतागुंत या सगळ्यात तिचं जग अडकलेलं असतं.
त्याचवेळी रोहन नावाचा पाहुणा तिच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि कथेला नवीन वळण मिळतं. हळूहळू नात्यांमध्ये बदल होत जातात आणि भावना अधिक गुंतागुंतीच्या होतात. शांत पण अर्थपूर्ण पद्धतीने उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते.
हा चित्रपट त्याच्या दृश्य सौंदर्यामुळे, सूक्ष्म भावनांमुळे आणि वेगळ्या कथनशैलीमुळे आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. YouTube वर उपलब्ध झाल्यामुळे हा फिलगुड अनुभव आता अधिक सोप्या पद्धतीने पाहता येतो.






