Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Dark Circles दूर करायचे आहेत? करा ‘हे’ घरगुती उपाय अन् मिळवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो
ताज्या बातम्या

Dark Circles दूर करायचे आहेत? करा ‘हे’ घरगुती उपाय अन् मिळवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो

Home Remedies For Dark Circle | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेची कमतरता, तणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि सतत स्क्रीनसमोर बसून काम करण्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circle) येण्याची समस्या वाढताना दिसत आहे. ही समस्या केवळ सौंदर्यावर परिणाम करत नाही, तर चेहरा थकलेला आणि निस्तेजही दिसू लागतो. अनेकजण यासाठी महागडी सौंदर्य प्रसाधने वापरतात, मात्र काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपायही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. जाणून घ्या असे काही खास उपाय ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा मिळू शकतो.

हेही वाचा – केस धुतल्यानंतर लगेच करू नका ‘ही’ चूक; नाहीतर केसांचं होईल नुकसान

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय

ग्रीन टी – ग्रीन टी बॅग्ज डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. यासाठी ग्रीन टी बॅग्ज काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून थंड करा. त्यानंतर या थंड टी बॅग्ज 10 ते 15 मिनिटांसाठी हलक्या हाताने डोळ्यांवर ठेवा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफिन त्वचेतील सूज कमी करण्यास मदत करतात आणि त्वचेला आराम देतात. या उपायामुळे डोळ्यांभोवतीचे रक्ताभिसरण सुधारते, सूज आणि थकवा कमी होतो तसेच काळी वर्तुळे हळूहळू फिकट होण्यास मदत मिळते.

काकडी – काकडी ही काळी वर्तुळे कमी करण्यास प्रभावी ठरते. काकडीचे थंडगार काप 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि ही प्रक्रिया दिवसातून 1 ते 2 वेळा करा. काकडीमधील पाणी आणि सौम्य अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची सूज आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात.

बटाटा – बटाट्यामधील काही गुणधर्म असतात जे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे एक कच्चा बटाटा किसून त्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांखाली लावा आणि 10-15 मिनिटांनी धुवून टाका. ही प्रक्रिया तुम्ही नियमित केली तर काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts