Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Mumbai
  • बुलडोझरसमोर गरीब नगरचा आक्रोश; वांद्र्यात कारवाईदरम्यान तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज
Mumbai

बुलडोझरसमोर गरीब नगरचा आक्रोश; वांद्र्यात कारवाईदरम्यान तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज

Bandra Slum Demolition: परिसरातील गरीब नगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. सलग दुसरी दिवशीही बुलडोझरच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम सुरू असताना परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

कारवाईदरम्यान काही स्थानिकांनी विरोध करत पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्याची घटना घडली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. वाढता तणाव लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळ तैनात करण्यात आलं आहे.

५ हजार स्क्वेअर मीटर जागेवर अतिक्रमण

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे परिसरात सुमारे ५ हजार स्क्वेअर मीटर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं होतं. या जागेवर भविष्यात रेल्वेचे पाच महत्वाचे प्रकल्प उभारले जाणार असल्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. परिसरात ५०० हुन अधीक झोपड्या असल्याने ही कारवाई पुढील तीन ते चार दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

एका परदेशी ब्लॉगर

या प्रकरणाकडे काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियाचं लक्ष वेधलं गेलं होतं. रेल्वे लाईनलगतच्या झोपडपट्ट्यांमुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा त्यानंतर रंगली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाईला वेग दिला.

2017 मध्येही अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न

याआधी 2017 मध्येही अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, काही रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रिया रखडली होती. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पात्र बांधकामांना संरक्षण देत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार पश्चिम रेल्वेकडून सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाच्या मते, अतिक्रमण हटवल्यानंतर या परिसरात अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी आवश्यक सुविधा आणि मार्ग विकसित करण्यात येणार आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts