Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, जिल्हा परिषदेवार ‘मविआ’ची सत्तास्थापन
Top News

सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, जिल्हा परिषदेवार ‘मविआ’ची सत्तास्थापन

Gopichand Padalkar on Jayant Patil

Sangli Zilla Parishad MVA Power : शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला आणि सांगली जिल्हा परिषदेवर (Sangli Zilla Parishad) अखेर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) सत्तास्थापन केली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले. भाषणादरम्यान जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली. आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रदेशद्वारात एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि वातावरण तापलं. सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा वडिलांचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला.

हेही वाचा – “भविष्यात सत्ता हाती घेणारच…”, राजकीय रणशिंग फुंकत पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल्याच पहायला मिळालं. काही वेळ दोन गटामध्ये तणाव पहायला मिळाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवले आणि संभाव्य अनुचित प्रकार टळला.

काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र

सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली. अध्यक्ष निवडीसाठी पडळकर भाजप नेत्यांसह जिल्हा परिषदेत उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडत असताना जयंत पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‌‘आमदार जयंत पाटील वाघ आहेत‌’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‌‘एकच छंद गोपीचंद‌’ अशा घोषणा पडळकर यांच्या समर्थकांनी दिल्या. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी चुकीच्या शब्दांचाही वापर केला. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. पडळकर जिल्हा परिषदेच्या इमारतीबाहेर आले. पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय भाजपला डिवचलं

त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जयंत पाटील समर्थकांनी त्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सुरुवातीला शांत असलेल्या पडळकर समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेत जयंत पाटील समर्थकांच्या घोषणांना प्रति-घोषणांनी उत्तर दिले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू असल्याने वातावरण अधिकच चिघळले. दोन्ही गटांतील तणाव वाढत असतानाच स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली, त्याचवेळी पडळकर गर्दीतून बाहेर पडले. मात्र काही काळ घोषणाबाजी सुरूच राहिली. अखेर पोलिस घटनास्थळी पोहचले. आणि तणावाची परिस्थिती हाताळली. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कडेकोट बंदोबस्तात दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाजूला केले.

9 सदस्य गोपीचंद पडळकर यांना मानणारे

अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीवेळी शिवसेना शिंदे पक्षाचे दोन सदस्य गैरहजर राहिले त्यामुळे पुन्हा दुसरांदा ही निवडणूक घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन सदस्यांनी भाजप युतीला मतदान केले. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे 16 सदस्य निवडून आले आणि त्यातील 9 सदस्य गोपीचंद पडळकर यांना मानणारे होते.

जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही – पडळकर

गेल्या काही दिवसांपुर्वीच्या भाषणादरम्यान गोपिचंद पडळकर यांनी माणसं कशासाठी पाठवली? कुठले पैसे घेतले ? एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. “अरे जयंत पाटला तुझ्या सारखी भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम बघून डोळे दिपून जातील तुझे. तु कार्यक्रम बघायला ये. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे?” अशी जहरी टीका पडळकर यांनी केली होती. त्यानंतर हा वाद पेटल्याचं पहायला मिळालं. अशातच या प्रकरणावरून स्वत: शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समजत आहे. अशी गलिच्छ टीका योग्य नसल्याचं शरद पवारांनी फडणवीसांना म्हटलं असून पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts